मुख्यपृष्ठ

“गुहागर प्रतिष्ठान ” (रजि.)

नोंदणी क्रमांक महाराष्ट्र राज्य पालघर – 157/2020 | एफ – ९८६५ (पालघर) (मुंबई आणि ग्रामीण)

गुहागर तालुक्याच्‍या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द

आमच्याबद्दल (About Us)

गुहागर प्रतिष्ठान हि संघटना अराजकीय असून, स्थापना दिनांक २६-जानेवारी- २०१७ रोजी करण्यात आली आहे. हि संघटना गुहागर तालुक्यापुरती मर्यादित असून गुहागर तालुक्यातून मुंबई / वसई-विरार /पुणे आणि इतर ठिकाणी, कामानिमित्त / व्यवसायासाठी / शिक्षणासाठी राहत असलेल्या सभासद आणि नागरिकांसाठी गेली 6 वर्ष कार्यरत आहे.

देणगी (Donations)

सदर QR कोड स्कॅन करून तुम्ही आम्हाला देणगी देऊ शकता. यासाठी तुम्ही फोनपे , गुगलपे, पेटीएम, किंवा इतर UPI अँप्स वापरू शकता. काही शंका,समस्या असल्यास कृपया आम्हाला संपर्क साधा.

सभासदत्व (Membership)

  • महिना – रु. २०
  • वार्षिक – रु. १२०
  • आजीवन सभासदत्व – रु. ५०१

सदर QR कोड स्कॅन करून तुम्ही आमचे सभासदत्व घेऊ शकता. यासाठी तुम्ही फोनपे , गुगलपे, पेटीएम, किंवा इतर UPI अँप्स वापरू शकता.

कृपया पेमेंट पूर्ण करून आपली माहिती भरून घ्यावी. 

संघटनेचे ध्येय / उद्दिष्टे आणि नियमावली (Aim & Vision)

संघटनेचे ध्येय / उद्दिष्टे आणि नियमावली पुढीलप्रमाणे :

१) सर्वांच्या सुखदुःखात सामील होणे व सामाजिक व आर्थिक मदत करणे.

२) या प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांना अधिकार सारखेच राहतील. कोणीही एक व्यक्ती अधिकार दाखवू शकत नाही . तसेच अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कमिटीकडे राहील.

३) प्रतिष्ठान मधील कोणतेही सभासद किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अडचणीत असल्यास (उदा. रुग्णालय, कोर्ट – कचेरी , शैक्षणिक इ . ) कमिटी चर्चा करून त्याला मदत करणे अनिवार्य राहील.

४) हि संघटना अराजकीय आहे, तरी कृपया कोणीही कोणत्याही प्रकारचे राजकारण मध्ये आणू नये.

५) या संघटने मार्फत शाळेय , शैक्षणिक , सामाजिक, कला आणि क्रीडा हे उपक्रम राबवले जातील.

६) कोणत्याही अडचणीला, प्रसंगाला किंवा कार्यक्रमाला सर्व सभासदांची उपस्थिती १००% असणे अनिवार्य राहील.

७) प्रतिष्ठानच्या कोणत्याही सभासदाने कोणतीही राजकीय अथवा जातीय पोस्ट प्रतिष्ठानच्या सोशल मीडिया ग्रुप / व्हाट्सअँप / फेसबुक पेज वर टाकू नये. असे जर कोणाकडून होत असल्यास संबंधित व्यक्तीला समज देऊन वाद टाळावा.

८) हि संघटना शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारधारणेनुसार चालणारी आहे. तरी त्यांच्या विचारांना व अस्मितेला गालबोट लागेल असं वर्तणूक कोणाकडून होणार नाही यांची सर्व सभासदांनी नोंद घ्यावी .

आमचे काम (Our Work)